Jaggery vs Sugar : गूळ की साखर, सर्वात चांगलं काय? ५ महत्त्वाच्या गोष्टी वाचाल तर सगळे गैरसमज होतील दूर

Shreya Maskar

साखर की गूळ

गुळामध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात, मात्र याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते तुम्हाला जास्त प्रमाणात खावे लागेल.

Jaggery | pinterest

पोषक घटक

मुळात साखर आणि गूळ हे दोन्ही साखरेचेच प्रकार आहेत. कॅलरीजच्या बाबतीत गूळ आणि साखर जवळपास सारखेच आहेत. दोन्हीमुळे रक्तातील साखरेची पातळी सारख्याच प्रमाणात वाढते.

Nutritional Content | pinterest

गूळ

जरी गुळावर कमी प्रक्रिया केली, तरी त्यातही एक प्रकारची अतिरिक्त साखर असतेच. तो साखरेपेक्षा थोडा अधिक चांगला असू शकतो, पण पोषणाच्या दृष्टीने तो सर्वोत्तम पर्याय नाही.

Jaggery | pinterest

मधुमेहीं गैरसमज

मधुमेहींसाठी गूळ सुरक्षित हा सर्वात सामान्य गैरसमजांपैकी एक आहे. गुळातून मिळणाऱ्या कॅलरीज या 'एम्प्टी कॅलरीज' असतात. गुळाचा ग्लायसेमिक प्रभाव साखरेसारखाच असतो कारण त्यात प्रामुख्याने सुक्रोज असते.

Diabetics | pinterest

रक्तातील साखर

मधुमेही रुग्ण गूळ अधिक सुरक्षित समजून त्याचे सेवन करतात, पण त्यामुळे त्यांची साखरेची पातळी वाढते. फरक केवळ प्रक्रियेमध्ये आहे, रक्तातील साखरेवर होणाऱ्या परिणामामध्ये नाही.

Blood Sugar | pinterest

गूळ पचनास मदत करतो

गूळ पचनसंस्थेतील विकरांना चालना देतो आणि मलविसर्जनास मदत करतो. मात्र त्याचे अतिसेवन टाळावे, यामुळे पोट फुगणे, वजन वाढणे आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी-जास्त होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Jaggery Aids Digestion | pinterest

गुळाचा दर्जा

सर्वच गूळ अधिक स्वच्छ बनवलेला नसतो. पांढऱ्या साखरेपेक्षा अधिक स्वच्छ असू शकतो, हे पुन्हा कारखान्यातील प्रक्रियेवर अवलंबून असते. यात कृत्रिम रंग किंवा अतिरिक्त साखरेचा पाकही असतो.गुळाचा क्वालिटी तपासण्यासाठी लेबल वाचणे आणि तो कुठून मिळवला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Quality of Jaggery | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मीठ खात नाही पण ब्लड प्रेशर वाढलेलाच असतो, का? जाणून घ्या

High BP | AI PHOTO
येथे क्लिक करा...