High BP : मीठ खात नाही पण ब्लड प्रेशर वाढलेलाच असतो, का? जाणून घ्या

Shreya Maskar

मीठ न खाता बीपी वाढणे

अनेकांना असे वाटते की, आहारात मीठ कमी केले, मीठ खाणे पूर्णपणे बंद केले, तर ब्लड प्रेशर वाढणार नाही. मात्र, मीठ कमी खाल्ल्यानंतरही रक्तदाब वाढू शकतो. कारण उच्च रक्तदाबासाठी केवळ मीठच जबाबदार नसते.

salt | pinterest

मानसिक ताण

कामाचा ताण, कौटुंबिक चिंता, आर्थिक समस्या यांमुळे शरीरात तणावाशी संबंधित हार्मोन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तात्पुरते वाढू शकतात.

mental stress | pinterest

किडनीचे आजार

किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर टाकण्यास मदत करते. किडनीचे कार्य बिघडल्यास शरीरात पाणी साचू शकते आणि रक्तदाब वाढू शकतो.

Kidney disease | pinterest

पुरेशी झोप न मिळणे

दररोज पुरेशी झोप न घेणे, रात्री वारंवार जाग येणे किंवा झोपेत श्वास अडखळण्याचा त्रास यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

sleep | pinterest

वाढते वजन

शारीरिक हालचाल कमी, बराच वेळ बसून राहणे यामुळे वजन वाढते, ज्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. शरीराचे वजन वाढल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.

Weight gain | pinterest

हार्मोन्सचे असंतुलन

थायरॉईड, शरीरातील हार्मोन्सशी संबंधित समस्या यांमुळे रक्तदाब वाढू शकतो. याशिवाय, काही वेदनाशामक औषधांचाही रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.

Imbalance of hormones | pinterest

आनुवंशिकता

कुटुंबातील आई-वडील, इतर जवळच्या नातेवाइकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हा धोका वाढतो. आनुवंशिकता आणि शरीराची रक्तदाब नियंत्रित करण्याची पद्धत यांचा यावर परिणाम होतो.

Heredity | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : 10 स्क्वॉट्स की ३० मिनिटं चालणं, सर्वात जास्त परिणामकारक काय? नेमकं उत्तर वाचा

Walking vs Squats | AI PHOTO
येथे क्लिक करा...