Walking vs Squats : 10 स्क्वॉट्स की ३० मिनिटं चालणं, सर्वात जास्त परिणामकारक काय? नेमकं उत्तर वाचा

Shreya Maskar

चालणे

चालणे हा निरोगी राहण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

to walk | pinterest

अभ्यास

msn ने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या अभ्यासात (Enhanced muscle activity during interrupted sitting improves glycemic control in overweight and obese men) असे आढळून आले की, दर ४५ मिनिटांनी १० स्क्वॅट्स केल्यावर जेवणानंतरची रक्तातील साखर कमी करण्यासाठी ३० मिनिटांच्या चालण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरते.

Study | pinterest

नेमका अभ्यास काय?

अभ्यासात जास्त वजन, लठ्ठ पुरुषांचा समावेश होता. संशोधकांनी ४ क्रिया पद्धतींची तुलना केली. यात अखंड बसणे, ३० मिनिटांचे चालणे, दर ४५ मिनिटांनी चालण्याचे आणि दर ४५ मिनिटांनी स्क्वॉट्स करणे. तेव्हा असे दिसून आले की, दीर्घकाळ बसून राहण्यापेक्षा सर्व प्रकारची हालचाल अधिक प्रभावी होती.

study | pinterest

संशोधन

संशोधकांच्या मते, एका सलग चालण्याच्या सत्राच्या तुलनेत वारंवार स्क्वॅट्स करण्याच्या सवयीमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण सुमारे ४०% ने सुधारले.

Research | pinterest

वारंवार हालचाल करणे का महत्त्वाचे?

दीर्घकाळ बसून राहिल्याने शरीराची रक्तातील साखरेचे प्रभावीपणे नियमन करण्याची क्षमता कमी होते. दिवसभरात लहान हालचालींचे ब्रेक घेतल्याने मोठे स्नायू सक्रिय राहतात, ज्यामुळे रक्तप्रवाहातून ग्लुकोज घेऊ शकतात.

frequent movement | pinterest

दररोज चालण्याचे फायदे

वजन व्यवस्थापनास मदत होते. चयापचय क्रिया सक्रिय राहते. भुकेशी संबंधित हार्मोन्सचे नियमन होते. हृदय, चयापचय आरोग्य चांगले राहते.

daily walking | pinterest

स्क्वॉट्सचे फायदे

स्क्वॉट्स नियमित केल्यास शरीराची ताकद वाढते आणि टिकून राहते. क्वाड्रिसेप्स, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग यांसारख्या प्रमुख स्नायू सक्रिय होतात. पडण्याचा धोका कमी होतो आणि हाडांची घनता वाढण्यास मदत होते.

Benefits of squats | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Leg Pain After Garba | AI PHOTO
येथे क्लिक करा...