Manasvi Choudhary
गूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
गुळाचे सरबत प्यायल्याने आरोग्याच्या समस्यांवर फायदा होतो.
गुळाचे सरबत बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
गुळाचे सरबत बनवण्यासाठी गूळ, पुदिना पाने, काळे मीठ, लिंबू, बर्फ आणि पाणी हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गुळाचा बारीक किस करून घ्या.
नंतर मिक्सरमध्ये गुळाचा किस, पुदिना पाने, लिंबाचा रस, काळे मीठ आणि पाणी हे वाटून घ्या.
संपूर्ण मिश्रण वाटल्यानंतर एका भांड्यात गाळून घ्या.
नंतर एका ग्लासमध्ये बर्फ घेऊन तयार गुळाचे सरबत सर्व्ह करा.