Manasvi Choudhary
लसणाची चटणी जेवणाची चव वाढवते.
लसणाची चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
लसणाची चटणी बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, मिरच्या, हिंग, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये बारीक गॅसवर लाल मिरच्या भाजून घ्या.
नंतर मिक्सरला लाल मिरची आणि मीठ जाडसर वाटून घ्या नंतर यात थोडा हिंग आणि लसणाच्या पाकळ्या वाटा.
यासंपूर्ण मिश्रणात पाणी घालू नये ज्यामुळे चटणी कोरडी बनेल.
चटणी खूप बारीक आणि चिकट होवू नये ही काळजी घ्यावी.
आता यामध्ये तुम्ही किसलेले सुके खोबरे किंवा तीळ देखील घालू शकता.
अशाप्रकारे लसणाची चटणी खाण्यासाठी तयार आहे.