Shreya Maskar
फणसाच्या बियांचे वडे बनविण्यासाठी फणसाच्या बिया, पाणी, कांदा, तांदळाचे पीठ इत्यादी साहित्य लागते.
फणसाच्या बियांचे वडे बनविण्यासाठी हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, मीठ, लवंग, दालचिनी इत्यादी मसाले लागतात.
फणसाच्या बियांचे वडे बनविण्यासाठी सर्वप्रथम चना डाळ स्वच्छ धुवून मिक्सरला वाटून घ्या.
फणसाच्या बियांची सालं काढून 2 भाग करा.
प्रेशर कुकरमध्ये फणसाच्या बिया मीठ घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
मिक्सरला उकडलेल्या फणसाच्या बिया, आलं, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, बडीशेप आणि पाणी टाकून पेस्ट करा.
मोठ्या बाऊलमध्ये चना डाळीचे मिश्रण, फणसाच्या बियांची पेस्ट आणि मीठ घालून कणिक छान मळून घ्या.
तयार पिठाचे वडे थापून तेलात खरपूस तळून घ्या.