Shreya Maskar
लहान मुलांसाठी पौष्टिक फणसाच्या आठळ्यांचे लाडू बनवा.
फणसाच्या आठळ्यांचे लाडू बनवण्यासाठी फणसाच्या बिया, ओलं खोबरं, तूप, भाजलेले शेंगदाणे, गूळ, वेलची पूड, मीठ आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
फणसाच्या आठळ्यांचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम फणसाच्या बिया काढून साल सोलून भाजून घ्या.
पॅनमध्ये साजूक तूप टाकून त्यात ओलं खोबरं खमंग भाजून घ्या.
आता मिक्सरच्या भांड्यात फणसाच्या बिया, भाजलेलं ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, गूळ, वेलची पूड आणि मीठ टाकून वाटून घ्या.
हाताला तेल लावून तयार मिश्रणाचे गोल लाडू वळून घ्या.
लाडूवर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील लावू शकता.
नाश्त्याला नियमित एक फणसाच्या आठळ्यांचे लाडू खाल्यामुळे आरोग्या चांगले राहते.