Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

Saam Tv

या ५ सवयी

सकाळी उठल्यानंतर आपण नकळत काही अशी काम करतो, ज्याचा नकळत परिणाम आपल्या किडनीवर होतो. या ५ सवयी बददल्यामुळे किडनीचे आरोग्य तुम्हाला चांगले ठेवता येईल.

KIDNEY HEALTH

सकाळी उठल्यावर पाणी न पिणे

८ ते १० तासाच्या झोपेमुळे शरीरात डिहायड्रेशन होते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. थेट चहा किंवा कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशन आणखी वाढते.

KIDNEY HEALTH | PINTERST

लघवी धरून ठेवू नका

सकाळी होणारी लघवी बराच वेळ धरून ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. वारंवार आणि दिर्घकाळ लघवी रोखून धरल्यामुळे मूत्राशयाच्या आणि किडनीच्या समस्या निर्माण होतात.

KIDNEY HEALTH

रिकाम्या पोटी पेनकिलर घेणे टाळा

सकाळी अंग दुखत असेल आणि तुम्ही रिकाम्या पोटी स्वत:हुन वारंवार पेनकिलर घेत असाल तर ही सवय किडनीला महागात पडू शकते.

KIDNEY HEALTH

व्यायामानंतर पाणी न पिणे

सकाळी व्यायाम करणं ही गोष्ट चांगली आहे . परंतु व्यायाम करून पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे किडनीपर्यंत योग्य प्रमाणात पाणी पोहोचत नाही.

KIDNEY HEALTH

पॅकेड्स फूड्स खाणे

सकाळी सकाळी नाश्ता न करता पॅकेड फूड्स किंवा प्रक्रिया केलेले फूड्स खाणे धोकादायक आहे. प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक घटकांनी भरपूर असलेला नाश्ता करणे गरजेचे आहे.

KIDNEY HEALTH

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

KIDNEY HEALTH

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

CHAPATI FLOUR | META AI
येथे क्लिक करा