Manasvi Choudhary
पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात तांब्या-पितळेची भांडी सहज पाहायला मिळायची, पण हल्ली ती कमी प्रमाणात दिसून येतात.
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने आरोग्याला असंख्य फायदे होतात. सकाळी या भांड्यातील पाणी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.
खाण्यापिण्याचा जितका आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तितकाच आपण कोणत्या भांड्यात अन्नपदार्ख खातो यावरही अवलंबून असते.
पचन सुधारण्यापासून ते हाडे मजबूत करण्यासाठी, थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.
मधुमेहामुळे किडनी व डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहाते.