Surabhi Jayashree Jagdish
हिंदू धर्मानुसार पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना शांती मिळते. त्यातून घरात सुख-समृद्धी आणि शांती नांदण्यास मदत होते.
पितृपक्षात काळी गाय दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे पितरांची उपस्थिती आणि त्यांचा आनंद व्यक्त करणारा संकेत मानला जातो.
कावळ्यांना पितरांचे प्रतीक मानलं जातं. पितृपक्षात कावळे दिसणं किंवा त्यांना भोजन मिळणं म्हणजे पितर संतुष्ट आहेत, असा संकेत मानला जातो.
पितृपक्षात गायीचा आवाज ऐकू आला, तर तो शुभ मानला जातो. याचा अर्थ पितरांचा आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते.
पितृपक्षात घरात काळ्या मुंग्या दिसणं शुभ मानलं जातं. हे संकेत धनप्राप्ती आणि समृद्धीच्या आगमनाशी जोडले जातात.
जर पितृपक्षात एखादं कोमेजलेला रोप अचानक फुलायला लागलं, तर हे पितरांच्या कृपेचं आणि घरात सकारात्मकतेचं चिन्ह असतं.
स्वप्नात पूर्वज आनंदी आणि सुखी अवस्थेत दिसले, तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ पितर संतुष्ट असून त्यांचा आशीर्वाद लाभतोय.
पितृपक्षात श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि दान करणं आवश्यक मानलं जातं. यामुळे पितरांना मोक्ष मिळतो.