Surabhi Jayashree Jagdish
समुद्राचं पाणी हे खारट असतं याची आपल्या प्रत्येकाला कल्पना आहे. मात्र तुम्हाला असा समुद्र माहितीये का ज्याचं पाणी खूप खारट आहे.
या समु्द्राचं पाणी माणसाच्या आरोग्यासाठी देखील धोकादायक मानलं गेलंय. या समुद्राचे पाणी जर माणसाच्या डोळ्यांत गेले तर तीव्र जळजळ होऊ शकते.
तुम्हाला माहितीये का या समुद्राला काय म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Dead Sea म्हणून ओळखले जाते.
या समुद्रात कोणत्याही जीवाला एक सेकंदापेक्षा जास्त जिवंत राहणे कठीण असते. जर माणसांच्या बाबतीत बोलायचे झाले तर फक्त ३० मिनिटांतच त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हे पाणी अत्यंत धोकादायक मानले जाते.
डेड सीमध्ये अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे याठिकाणी सतत मीठ साचत राहतं. यामुळे या समुद्राचे पाणी अधिक खारट होत जाते.
या समुद्रात ताजं पाणी फार कमी प्रमाणात येतं. त्यामुळे याठिकाणी असलेलं मीठ विरघळत नाही. यामुळे मीठाचा साठा सतत वाढत राहतो.
हजारो वर्षांपासून मीठ जमा होत आहे. त्यामुळे हा समुद्र जगातील सर्वात खारट समुद्र बनला आहे. आज तो जगभरात डेड सी म्हणून प्रसिद्ध आहे.