Manasvi Choudhary
फ्रिजमुळे आपल्याला अनेक पदार्थ आपल्या सोयीनुसार स्टोर करून ठेवायची सवय झाली आहे. पण प्रत्येक वेळी सर्व पदार्थ चांगले राहतील असे नाही. काही पदार्थांना फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलते.
फ्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात आपण उकडलेला बटाटा स्टोर करून ठेवतो. तर मग आज उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावर काय परिणाम होते हे जाणून घेऊयात...
फ्रिजमधील थंड तापमानामुळे बटाट्याची चव बदलते.
उकडलेल्या बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर असते. पण हेच बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामधील पोषक घटक निघून जातात.
फ्रिजमधील जास्त ओलावा जीवाणूंच्या वाढीस उत्तेजन देतो. त्यामुळे उकडलेला बटाट खराब होऊ शकतो.
उकडलेले बटाटे फ्रिजमधील इतर पदार्थांमधील चव आणि गंध शोषून घेतात. यामुळे बटाट्याला वास येतो आणि चव बदलते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला द्या.