Shruti Vilas Kadam
ईशा मलविया ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती झी टीव्ही व कलर्सवरील मालिकांमुळे विशेष प्रसिद्ध झाली आहे. तसेच सध्या ती शेकी शेकी गाण्यामुळे चर्चेत आहे.
ईशा मलविया हिला खरी ओळख मिळाली ‘उडारियां’ या टीव्ही मालिकेमधून. या मालिकेत तिने 'जस्मिन' हे पात्र साकारले, जे अत्यंत चर्चेत आले.
ईशाने लहान वयातच मॉडेलिंग आणि डान्समध्ये आपले कौशल्य दाखवले. तीने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
ईशा इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर खूप सक्रिय आहे. तिच्या ट्रेंडी लूक, ट्रॅव्हल व्ह्लॉग्स आणि डान्स व्हिडिओंना लाखो लाइक्स मिळतात.
ती केवळ अभिनेत्री नाही, तर फॅशन आयकॉनही आहे. तिचा वेस्टर्न व पारंपरिक ड्रेसिंग सेन्स चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
ईशा मलविया आणि ‘बिग बॉस’ फेम अभिषेक कुमार यांचं नातं व त्यानंतर झालेलं ब्रेकअप सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलं.
ईशा सध्या विविध वेब सिरीज, म्युझिक व्हिडिओ आणि फॅशन प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तिचा चाहतावर्ग तिच्या पुढील मोठ्या कामासाठी आतुर आहे.