Pressure cooker health risk: तुमच्या किचनमध्ये असलेला कुकर किती दिवसांनी बदलला पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

घरातील कुकर

ज्या प्रेशर कुकरमध्ये आपण रोज जेवण बनवतो, तोच कुकर हळूहळू तुम्हाला आजारी पाडतोय. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे तोच कुकर वापरला जातो. पण जुन्या कुकरमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Old pressure cooker danger | saam tv

अॅल्युमिनियम अन्नात मिसळतं

जुना किंवा खूप वापरलेला प्रेशर कुकर अन्नात अॅल्युमिनियम मिसळण्याचा धोका वाढवतो. हे अॅल्युमिनियम हळूहळू अन्नातून शरीरात जाऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Aluminium cookware health

अॅल्युमिनियम शरीरात साठण्याची शक्यता

अन्नातून शरीरात गेलेलं अॅल्युमिनियम रक्तात मिसळू शकतं. हळूहळू ते हाडं आणि मेंदूमध्येही साठू लागतं. यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो.

Cooking utensils safety

आरोग्यावर गंभीर परिणाम

शरीरात अॅल्युमिनियम जास्त प्रमाणात साठल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतात. याचा परिणाम हाडांच्या मजबुतीवर आणि मेंदूच्या कार्यावर होऊ शकतो. म्हणूनच स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.

Pressure cooker safety tips

प्रेशर कुकर किती वर्षे वापरावा?

तज्ज्ञांच्या मते, प्रेशर कुकर खूप वर्षे वापरणं सुरक्षित नसतं. साधारणपणे 10 वर्षांपेक्षा जुना कुकर बदलणं योग्य मानलं जातं. यामुळे आरोग्याशी संबंधित संभाव्य धोके टाळता येतात.

Aluminium in food

कधी बदलावा कुकर?

जर तुमचा प्रेशर कुकर 10 वर्षांपेक्षा जास्त जुना असेल तर तो बदलण्याचा विचार करा. जुना कुकर वापरत राहिल्यास अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. नवीन आणि सुरक्षित कुकर वापरणं आरोग्यासाठी योग्य असतं.

Cooking utensil safety

कुकर खराब झाल्याची चिन्हं

कुकरच्या आत खोल चीरा दिसू लागल्या किंवा काळे डाग पडले असतील तर ते धोक्याचं लक्षण असू शकतं. तसंच कुकरचे झाकण किंवा शिटी लूज झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Aluminium exposure health

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा