Smartphone Tips: जुना फोन स्लो झालाय? या सोप्या ट्रिक्सने वाढवा स्पीड

Surabhi Jayashree Jagdish

गरज नसलेले अ‍ॅप्स

आपण अनेकदा गरजेनुसार अ‍ॅप्स डाउनलोड करतो पण नंतर त्यांचा वापर करत नाही. असे अ‍ॅप्स फोनमध्ये स्टोरेजची जागा घेतात आणि काही अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्येही सुरू राहू शकतात. त्यामुळे वापरात नसलेली अ‍ॅप्स डिलीट करा.

How to Make Phone Faster | saam tv

फोनचं सॉफ्टवेअर

फोनच्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे सिक्युरीटीच्या समस्या दूर होण्यास आणि काही तांत्रिक अडचणी सुधारण्यास मदत होते. यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘सॉफ्टवेअर अपडेट’ हा पर्याय तपासा आणि अपडेट उपलब्ध असल्यास आवश्यक खबरदारी घेऊन तो इन्स्टॉल करा.

Android Software Update | saam tv

होम स्क्रीनवरील गोष्टी कमी करा

लाइव्ह वॉलपेपर, सतत अपडेट होणारे विजेट्स आणि होम स्क्रीनवरील अनेक शॉर्टकट फोनच्या काही रि वापर करू शकतात. त्यामुळे लाइव्ह वॉलपेपरऐवजी साधा वॉलपेपर वापरा आणि गरज नसलेले विजेट्स काढून टाका. यामुळे अनावश्यक हालचाली कमी होऊ शकतात आणि काही फोनमध्ये कामगिरी सुधारण्यास मदत मिळू शकते.

Smartphone Troubleshooting | saam tv

अ‍ॅनिमेशनचा स्पीड

काही अँड्रॉइड फोनमध्ये ‘डेव्हलपर ऑप्शन्स’मध्ये अ‍ॅनिमेशनचा स्पीड बदलण्याचे पर्याय उपलब्ध असतात. त्यामध्ये ‘विंडो अ‍ॅनिमेशन स्केल’, ‘ट्रान्झिशन अ‍ॅनिमेशन स्केल’ आणि ‘अ‍ॅनिमेटर ड्युरेशन स्केल’ हे पर्याय 0.5x वर ठेवल्यास स्क्रीनवरील हालचाली वेगाने झाल्यासारख्या वाटू शकतात.

Software Update | saam tv

फोनमध्ये स्टोरेज मोकळं ठेवा

फोनची इंटरनल स्टोरेज भरलं असेल तर काही कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नको असलेले फोटो, व्हिडिओ, डाउनलोड केलेल्या फाइल्स आणि वापरात नसलेले अ‍ॅप्स तपासून स्पेस मोकळं करा.

Phone Lag Fix | saam tv

फोन रीस्टार्ट करा

फोन वारंवार स्लो होत असेल तर तो एकदा बंद करून पुन्हा सुरू करून पाहा. रीस्टार्ट केल्याने काही तात्पुरत्या सॉफ्टवेअर समस्या दूर होऊ शकतात आणि फोनचं कामकाज सुरळीत होण्यास मदत मिळू शकते.

Smartphone | saam tv

हँग होण्याचं कारण शोधा

फोन वारंवार गरम होत असेल, अ‍ॅप्स अचानक बंद पडत असतील किंवा स्टोरेज मोकळं असूनही फोन स्लो चालत असेल तर त्यामागे अ‍ॅप, बॅटरी किंवा हार्डवेअरशी संबंधित समस्या असू शकते. अशा वेळी अलीकडे इन्स्टॉल केलेल्या अ‍ॅप्समुळे अडचण येतेय का, हे तपासा आणि कारण शोधा

Phone Storage Management | saam tv

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Engine oil change | saam tv
येथे क्लिक करा