Air Conditioner Tips : AC चा अतिवापर ठरू शकतो धोकादायक! जाणून घ्या दुष्परिणाम

Saam Tv

AC चा जास्त वापर आरोग्यासाठी घातक?

गरमीमध्ये AC मुळे मोठा दिलासा मिळतो , मात्र दिवसभर थंड वातावरणात राहिल्यास शरीरावर त्याचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात.त्यामुळे AC चा योग्य तापमान आणि मर्यादित वापर महत्त्वाचा आहे.

त्वचा आणि ओठ कोरडे पडतात

AC हवेतला ओलावा कमी करतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, खाज येणे,कमी वयात सुरकुत्या पडणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकते.

dry skin | pintrest

डोळ्यांवर होतो परिणाम

सतत AC मध्ये राहिल्याने डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे, जळजळ, लालसरपणा याचा त्रास वाढतो.

eyes allergy | pintrest

श्वसनाचे आजार बळावतात

वेळेवर साफसफाई न केलेल्या AC मध्ये धूळ, बुरशी आणि जंतू साचतात. यामुळे अॅलर्जी, सर्दी, अस्थमा, सायनस यांसारखे श्वसनाचे आजार बळावतात

breathing problems | pintrest

डोकेदुखी आणि थकवा

अतिथंड तापमानात दीर्घकाळ राहिल्याने काही लोकांना डोकेदुखी, चक्कर, सुस्ती आणि थकवा जाणवतो.

headache and weakness | pintrest

सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना

थंड हवा सतत शरीरावर पडल्यास स्नायू ताठर होऊ शकतात. विशेषतः मान, पाठ, खांदे आणि गुडघेदुखी असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होतो.

Pain in joints and muscles | pintrest

तापमानातील अचानक बदल धोकादायक

थंड AC रूममधून थेट कडक उन्हात गेल्यास शरीरावर ताण येतो. यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे किंवा काही वेळा उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

healthcare tips | pintrest

AC वापरताना घ्या या काळजी

AC चे तापमान 24 ते 26°C ठेवा, प्रत्येक 1-2 तासांनी काही वेळ नैसर्गिक हवेत जा, भरपूर पाणी प्या, AC फिल्टर नियमित स्वच्छ करा आणि थंड हवा थेट शरीरावर लागू देऊ नका.

healthcare tips | pintrest

Tech Tips : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? फॉलो करा 'या' ८ स्मार्ट ट्रिक्स

Tech-Tips | meta ai
येथे क्लिक करा