Surabhi Jayashree Jagdish
सकाळी रिकाम्या पोटी विशेषतः दूध आणि साखर घातलेला चहा प्यायल्यास काही लोकांना अॅसिडिटी, गॅस किंवा पोटात जळजळ होऊ शकते. ही समस्या प्रत्येकाला होईलच असं नाही.
ब्लॅक टीमध्ये कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे तो तुलनेने चांगला पर्याय मानला जातो. मात्र, दूधाच्या चहामध्ये फुल-फॅट दूध आणि जास्त साखर वापरल्यास अतिरिक्त कॅलरी व सॅच्युरेटेड फॅट शरीरात जातात.
ग्रीन टी आणि ब्लॅक टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर मानलं जातात. हे घटक पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात. मात्र, ग्रीन टी किंवा ब्लॅक टीला कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध समजणे योग्य नाही.
उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, अॅसिडिटी, गॅस, अल्सर किंवा झोपेच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी चहाचं प्रमाण मर्यादित ठेवावं. कॅफेनमुळे काही लोकांमध्ये रक्तदाब वाढणं किंवा झोपेवर परिणाम होऊ शकतो.
दररोज चहा पिण्याची सवय असल्यास कमी साखर किंवा साखर नसलेला ब्लॅक टी अथवा ग्रीन टी हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. दिवसभरात वारंवार जास्त गोड आणि कडक चहा पिणं टाळावं.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ चहा बदलणे पुरेसं नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वजन नियंत्रण ही हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य आहे.
केवळ चहा प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. PubMed वर प्रकाशित काही संशोधनांनुसार, सामान्य प्रमाणात ब्लॅक टी प्यायल्याने LDL (बॅड) कोलेस्ट्रॉल वाढत असल्याचं स्पष्ट दिसून आलेलं नाही.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.