Nail Health : नखांवर असा पांढरा चट्टा दिसतोय, हृदय आणि किडनीशी काय आहे संबंध? वाचा

Saam Tv

नखांच्या मॅट्रिक्सचा भाग

नखांच्या मुळाशी दिसणारा पांढरा अर्धचंद्र हा नखांच्या मॅट्रिक्सचा भाग असतो. पण हाच पांढरा भाग अनेक आजारांचे संकेत असतात. त्याच्या रंगात होणारे बदल आजारांची लक्षणे मानली जातात.

HALF MOON ON NAILS | PINTREST

पांढऱ्या अर्धचंद्राला lunula म्हणतात.

निरोगी lunula हा फिकट पांढरा, अर्धगोलाकार,समान रंगाचा असतो. त्याला कडा किंवा डाग नसतात. तसेच वयानुसार तो लहान आणि कमी होत असतो.

HALF MOON ON NAILS | PINTREST

निळसर किंवा जांभळा lunula - हृदयाचा इशारा

lunula जांभळा किंवा निळसर रंगाचा दिसल्यास रक्ताभिसरणात अडथळा किंवा हृदयावर ताण असल्याचे लक्षण असते. नखांवर येणारी हि निळसर छटा शरीरात ऑक्सिजनची कमी असल्याचे स्पष्ट सांगते.

HALF MOON ON NAILS | PINTREST

लाल रंगाचा lunula

लालसर lunula हा ऑटोम्यून आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या किंवा कोलजनच्या आजाराशी संबंधित असतो.

HALF MOON ON NAILS | PINTREST

पिवळसर lunula

पिवळा रंग आल्यास कावीळ, नखांना बुरशीजन्य संसर्ग किंवा इतर आजाराशी लक्षणे असतात.

HALF MOON ON NAILS | PINTREST

खूप मोठा किंवा खूप लहान lunula

lunula नखाच्या आकारापेक्षा मोठा असेल तर उच्च रक्तदाब किंवा सततच्या तणावाचे लक्षण असू शकते. तर लहान lunula लोहाची कमतरता, कमी ऑक्सिजन पुरवठा, थायरॉईड यांचे लक्षण असते.

HALF MOON ON NAILS | PINTREST

किडनीच्या आजाराशी संबंध

नखाच्या मुळाशी असलेला हा lunula किडनीच्या आजाराचे लक्षण नाही,तर तो नखांचा निरोगी आणि सामान्य भाग आहे. हा भाग नवीन नखे तयार करणाऱ्या पेशींमुळे पांढरा दिसतो.

HALF MOON ON NAILS KIDNEY | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

HALF MOON ON NAILS KIDNEY | PINTRSEST

Teeth Whitening : पिवळ्या दातांमुळे हसताना लाज वाटते? दात पांढरेशुभ्र करण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय

Teeth Whitening | saam tv
येथे क्लिक करा