Dengue Awareness: पावसाळ्यात डेंग्यूचा धोका वाढतोय? हे नैसर्गिक उपचार करू शकतात मदत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विषाणूजन्य आजार

डेंग्यू हा एडीस डासांच्या चाव्यामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे, जो पावसाळ्यात विशेषतः जास्त प्रमाणात आढळतो.

डेंग्यूचे रुग्ण

जून ते ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचे रुग्ण वाढतात, असे महापालिकेच्या आरोग्य अहवालामधून स्पष्टपणे दिसून येते.

तीव्र ताप

डेंग्यू झाल्यावर सुरुवातीला अंग थंड वाटते आणि नंतर काही दिवसांत तीव्र ताप चढतो, अशी लक्षणे दिसतात

अंगदुखी

डेंग्यूच्या रुग्णांना तापासोबत अंगदुखी, सांधेदुखी आणि थकवा यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.

संसर्गजन्य

यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट कमी होण्याबरोबरच सर्दी, खोकला यांसारखे संसर्गजन्य लक्षणेही आढळून येत आहेत.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

ताप जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पाणी साचू नये याची दक्षता घ्या.

ड्राय डे

आठवड्यातून एक दिवस 'ड्राय डे' ठेवा, साचलेले पाणी रिकामे करा आणि भांडी नीट स्वच्छ करा.

NEXT: केक आवडतो पण तो ताजा आहे की खराब? जाणून घ्या ओळखण्याचे सोपे पर्याय

येथे क्लिक करा