House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Surabhi Jayashree Jagdish

घरातील पाल

घरात नेहमी दिसणारी सामान्य पाल म्हणजेच हाऊस लिझर्ड किंवा हाऊस गेको साधारणपणे विषारी नसते. तिच्या चाव्यामुळे साप किंवा विषारी प्राण्याच्या चाव्यासारखे विष शरीरात पसरत नाही. त्यामुळे घरात पाल दिसली म्हणून घाबरण्याचं कारण नसतं.

House gecko | saam tv

पाल चावल्यास काय होऊ शकतं?

पाल चावल्यास चावलेल्या ठिकाणी किरकोळ वेदना, लालसरपणा, सूज किंवा खाज येऊ शकते. त्वचेवर जखम झाली असेल तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. चावा मोठा असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर जखमेची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.

Lizard bite first aid

पाल सहसा माणसाला चावत नाही

पाल ही माणसांवर हल्ला करणारा किटक नसू ती साधारणपणे माणसांपासून दूर राहते. घरातील भिंतीवर किंवा छताजवळ दिसणारी पाल मुख्यतः लहान कीटक, माश्या आणि इतर छोटे जीव खाते.

House lizard bite treatment | saam tv

पाल चावल्यावर लगेच काय करावं?

पालीने चावा घेतल्यास चावलेली जागा वाहत्या पाण्याने आणि साबणाने व्यवस्थित धुवावी. जखमेतून रक्त येत असल्यास स्वच्छ कापडाने हलका दाब देऊन रक्तस्राव थांबवावा. जखम मोठी असेल रक्तस्राव थांबत नसेल किंवा जागेची सूज आणि लालसरपणा वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

House gecko bite | saam tv

स्वच्छतेची काळजी घ्या

पाल विषारी नसली तरी तिच्या शरीरावर किंवा विष्ठेत सूक्ष्मजंतू असू शकतात. त्यामुळे पाल किंवा तिच्या विष्ठेच्या संपर्कानंतर हात साबणाने नीट धुणं महत्त्वाचं आहे. विशेषतः स्वयंपाकघरातील अन्न, भांडी आणि खाण्याच्या वस्तू पालच्या संपर्कापासून दूर ठेवाव्यात.

Lizard in home | saam tv

अन्न आणि पाल

पाल अन्नावरून गेली किंवा तिची विष्ठा अन्नात पडली असल्यास ते अन्न खाणं टाळावं. अन्न दूषित झाल्यास पोटाशी संबंधित त्रास किंवा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अन्न झाकून ठेवणं आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे.

Lizard bite wound care | saam tv

ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जा

चावलेल्या जागेची सूज वाढणं, तीव्र वेदना, पू येणं किंवा ताप येणं अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्वास घेण्यास त्रास, चेहरा किंवा घसा सुजणं यासारखी गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

Lizard bite emergency | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

House lizard hygiene | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Cinnamon water | saam tv
येथे क्लिक करा