Sakshi Sunil Jadhav
साबुदाण्यामध्ये स्टार्च असल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढायला सुरुवात होऊ शकते. Sabudana
साबुदाणे जास्त खाल्ल्यास पोटात गॅस, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.
साबुदाण्यामध्ये प्रथिने व फायबर कमी असल्यामुळे ब्लड शुगर जलद वाढतो.
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी सतत साबुदाणा खाल्ल्यास शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो.
साबुदाणा पाणी शोषून फुगतो त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगल्यासारखं वाटू शकतं.
साबुदाण्यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन यांचा अभाव असल्याने फक्त साबुदाण्याच्या आहारातून शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही.
जास्त कार्बोहायड्रेट्समुळे तात्पुरती ऊर्जा मिळते पण नंतर थकवा जाणवतो.
काहींना साबुदाणे खाल्ल्यानंतर अॅलर्जी, पुरळ किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.