Sakshi Sunil Jadhav
१ कप फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, बीन्स, कांदा, मैदा, कॉर्नफ्लोअर, आलं-लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, मीठ, मिरी पावडर, तिखट, अजिनोमोटो, तेल इ.
सर्व भाज्या स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्या. फ्लॉवरचे लहान तुकडे करून थोडं उकळून घ्या.
एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरी पावडर टाकून घट्टसर पीठ तयार करा. भाज्या या पिठात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा.
कढईत तेल गरम करून या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात डीप फ्राय करा. सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळलेल्या भाज्या बाजूला किचन पेपरवर काढून ठेवा.
एका पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात कांदा, शिमला मिरची, बीन्स आणि गाजर परता.
त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, थोडं मीठ आणि अजिनोमोटो घालून चांगलं मिक्स करा.
शेवटी तळलेल्या भाज्या यात टाकून सर्व मिक्स करा आणि २ मिनिटं झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गरमागरम वेज क्रिस्पी सर्व्ह करा. हवं असल्यास वरून थोडं तिळाचं तेल किंवा कोथिंबीर टाकू शकता.