Sakshi Sunil Jadhav
साधारणपणे ५ ते ७ वर्षांनंतर प्रेशर कुकर बदलला पाहिजे असं तज्ज्ञ सुचवतात.
गॅस्केट रबर रिंग वारंवार खराब होत असेल तर कुकर जुना झालाय हे समजले पाहिजे.
झाकण घट्ट लॉक होत नसेल तर बदल करणे गरजेचे आहे.
प्रेशर येण्याआधीच वाफ बाहेर सुटत असेल तर कुकर वापरणं धोकादायक ठरू शकतं.
कुकर वाकडी, खरचटलेली किंवा तडे गेलेली असतील तर लगेच नवीन घ्यावी.
शिट्टी नीट वाजत नसेल किंवा प्रेशर जास्त वेळ टिकत नसेल तर कुकर खराब झाल्याचे लक्षण आहे.
जुना कुकर वापरल्याने धातूची लेअर निघून अन्नात मिसळू शकते, हे आरोग्यास अपायकारक ठरु शकतं.
नियमित देखभाल करूनही समस्या सुटत नसतील तर नवीन कुकर घेणे सुरक्षित.