Bhakri Tips: बाजरीची भाकरी तव्याला चिटकतेय? या टिप्सने भाकरी बनेल परफेक्ट

Surabhi Jayashree Jagdish

भाकरी

आपल्या जेवणात भाकरीचा समावेश असतो. मात्र अनेकदा भाकरी भाजताना ती तव्यावर चिकटते. असं होऊ नये त्यासाठी आम्ही काही टीप्स देणार आहोत.

तव्याचं तापमान

तवा खूप गरम किंवा खूप थंड असेल तर भाकरी चिकटते. मध्यम तापमानावर तवा नीट तापू द्या. गरज वाटल्यास तव्यावर थोडं पाणी शिंपडून तापमान बघा

तव्यावर तेल टाका

भाकरीच्या आधी तव्यावर अगदी हलकं तेल किंवा तूप लावा. तेल अधिक लावू नका. यामुळे भाकरीची पहिली बाजू चिकटत नाही.

मऊ आणि लवचिक पीठ

कोरडं किंवा जास्त कडक पीठ तव्याला चिकटू शकतं. पीठात गरजेनुसार कोमट पाणी घालून मऊसूत बनवा. लवचिक पीठ तव्यावर नीट राहते.

कोरडं पीठ कमी वापरा

खूप कोरडं पीठ वापरल्यास तळाचा भाग कच्चा राहून चिकटू शकतो. फक्त हाताला लागेल इतकंच पीठ वापरा. अतिरिक्त पीठ तव्यावर जळून चिकटपणा वाढवतं.

पहिली बाजू नीट शिजू द्या

भाकरी उलटायला घाई केली तर ती फाटते आणि तव्याला चिकटते. पहिली बाजू शिजून थोडी कोरडी दिसली की उलटा. योग्य वेळ दिल्यास भाकरी आपोआप सुटते.

भाकरीवर थोडं कोमट पाणी शिंपडा

भाकरी तव्यावर ठेवण्यापूर्वी हलक्या हाताने वरच्या बाजूला पाणी शिंपडा. यामुळे पृष्ठभाग नरम राहून चिकटपणा कमी होतो.

Skin care: थंडीमध्ये हात काळे होतायत? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

येथे क्लिक करा