Manasvi Choudhary
डायबिटीजच्या रुग्णांना खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
विशेषत: फळे खाताना डायबिटीजच्या रूग्णांनी काळजी घेणे महत्वाचे आहे अन्यथा रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.
किवी हे फळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. किवीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो.
किवी खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोज वाढत नाही यामुळे डायबिटीज असल्यास किवी हे फळ खाऊ शकता.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडट्स गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पपई आणि जांभूळ या फळांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांनी करणे फायदेशीर असते. पपई खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
मधुमेहांनी बेरी फळाचे सेवन केल्यास आरोग्यास फायदा होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.