ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थंडीच्या दिवसात सगळेच जण सॉक्स घालतात. पायामधूनच थंडी शरीरीत प्रवेश करते. सॉक्स हे पायांना उब देण्याचे काम करतात.
तुम्ही रात्री झोपताना देखील सॉक्स घालतात, तर जाणून घ्या रात्री झोपताना सॉक्स घालायचे किंवा नाही.
रात्री झोपताना शरीराचे तापमान हलकेसे गरम असते आणि सॉक्स घातल्यामुळे शरीराचे तापमान अधिक गरम होऊ शकते.
सॉक्स घालून झोपल्यामुळे पायांना सतत घाम येत राहिल आणि त्याने पायांना वास येण्यास सुरुवात होईल.
रात्रभर सॉक्स घालून झोपल्यामुळे पायांना फंगल इनफेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे पायांची सालपटे निघू शकतात.
सॉक्स घालून झोपल्यामुळे जास्त गरम होण्यास सुरुवात होते. यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.
घट्ट सॉक्स घातल्यामुळे ब्लड सर्क्युलेशनवर देखील वाईट परिणाम होऊ शकतात.
रात्री झोपताना सॉक्स घालून झोपण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्हाला जास्त थंडी लागत असेल तर तुम्ही हलके सॉक्स घालू शकता.