Sakshi Sunil Jadhav
काही व्यक्तींना हिवाळा असो किंवा उन्हाळा, ते थंड पाण्याने अंघोळ करणेच पसंत करतात. कारण त्यांना त्याची सवय झालेली असते.
काही व्यक्ती कोणत्याही ऋतूत गरम पाण्यानेच अंघोळ करतात. कारण थंड पाणी त्यांना सहन होत नाही.
पुढे आपण हिवाळ्यात कोणत्या पाण्याने अंघोळ केली पाहिजे? याबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र यामध्ये फायदे आणि नुकसान या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.
काहींच्या मते थंड पाण्याने अंघोळ केल्यावर दिवसभरातला थकवा कमी निघून जातो. झोप शांत लागते आणि हिवाळ्यात थंडी लागत नाही.
तज्ज्ञांच्या मते, आपण हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे. त्यामध्ये जास्त गरम पाण्याचा वापर करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्हाला त्वचेच्या इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
त्वचा रोगतज्ज्ञांच्या मते, जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यावर स्कीन ड्राय होण्याच्या समस्या वाढतात. त्यामुळे थंडीत अंघोळीचे पाणी गरम करताना लक्ष दिले पाहिजे.
तज्ज्ञांच्या मते, थंडीत अंघोळीचे पाणी गरम करताना इतकेच लक्षात ठेवले पाहिजे की, त्या पाण्याने आपल्याला जास्त थंडी वाजणार नाही. तुमचं थंडीपासून संरक्षण होईल.
कारण आपल्या त्वचेच्या सगळ्यात वरच्या लेअरवर सेबम आणि लिपिड्सची बारिक लेअर असते. जी आपले धूळ, बॅक्टेरिया आणि स्कीन इनफेक्शनपासून वाचवतात आणि स्कीन सॉफ्ट ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे जास्त गरम किंवा खूप थंड पाण्याने अंघोळ घेणे टाळावे.