Car Washing: कार धुतल्यानंतर लगेच चालवणे योग्य आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

कार धुणं

कार स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक जण नियमितपणे कार धुतात. यामुळे कारवरील धूळ, माती आणि इतर घाण निघून जाते. कारचे बाहेरील भाग स्वच्छ राहण्यासाठी पाण्याने धुणे हा एक सोपा मार्ग आहे.

Car maintenance | saam tv

धुतल्यानंतर लगेच ड्रायव्हिंग

काही जण कार धुतल्यानंतर लगेचच गाडी चालवायला सुरुवात करतात. मात्र गाडीच्या काही भागांवर पाणी राहिलं असल्यास ते आधी कोरडं करणं महत्त्वाचे आहे. त्यामुळे कार सुरू करण्यापूर्वी ब्रेक, टायर, काचा आणि आरसे एकदा तपासून घ्यावेत.

Brake performance | saam tv

ब्रेकवर होतो परिणाम?

कार धुतल्यानंतर ब्रेकच्या डिस्क किंवा ड्रमवर पाणी राहू शकते. अशा वेळी सुरुवातीला ब्रेक दाबल्यावर त्यांची पकड काही प्रमाणात कमी जाणवू शकते. त्यामुळे गाडी चालवण्यापूर्वी ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासा.

Wet tyres | saam tv

टायर आणि रस्त्याची पकड

कार धुतल्यानंतर टायर ओले असू शकतात. पावसाळ्यात रस्ताही ओला असल्याने गाडी चालवताना अधिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत अचानक ब्रेक लावणे किंवा वेगाने गाडी वळवणे टाळावे.

Safe driving tips | saam tv

काचा आणि आरसे कोरडे करा

कारच्या काचा आणि साइड मिररवर पाण्याचे थेंब राहिल्यास रस्ता स्पष्ट दिसण्यात अडचण येऊ शकते. रात्रीच्या वेळी किंवा समोरून वाहनांच्या लाईटचा प्रकाश येत असल्याने आरशातून दिसण्यावर दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गाडी सुरू करण्यापूर्वी सर्व काचा आणि आरसे स्वच्छ, कोरड्या कापडाने पुसून घ्यावेत.

Car glass cleaning | saam tv

ब्रेक तपासून घ्या

कार सुरू केल्यानंतर लगेच वेगाने गाडी चालवू नका. मोकळ्या आणि सुरक्षित जागेत कमी वेगाने गाडी पुढे घेऊन ब्रेक हलकेच दाबून पाहा. ब्रेकची पकड आणि प्रतिसाद नेहमीप्रमाणे असल्याची खात्री करून घ्या.

Vehicle maintenance | saam tv

मगच सुरू करा प्रवास

ब्रेक व्यवस्थित काम करत असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रवासाला सुरुवात करा. तसेच कारच्या काचा आणि साइड मिररवरील पाणी पूर्णपणे पुसून घ्या. या सर्व गोष्टी तपासल्यानंतर सुरक्षितपणे गाडी चालवता येईल.

Wet road driving | saam tv

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

engine oil change interval | saam tv
येथे क्लिक करा