Dhanshri Shintre
शेंगदाणे सामान्यतः पौष्टिक असतात आणि त्यात प्रथिने, फायबर्स, आणि महत्त्वाची खनिजे असतात.
ते शरीरासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या पोषक तत्त्वांचे स्रोत आहेत.
मात्र, काही लोकांना शेंगदाणा खाणे हानिकारक ठरु शकते, ज्यामुळे पचनसंस्था किंवा इतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
काही लोकांना शेंगदाण्यांपासून ॲलर्जी होऊ शकते. पुरळ, श्वासोच्छ्वासाचा त्रास, पोटात वेदना, आणि मळमळ हे त्रास देखील होऊ शकतात.
अधिक शेंगदाणे खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे पोटात दुखणे वैगेरे त्रास होऊ शकतो.
ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा जे लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, त्यांना शेंगदाण्यांचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे.
कच्चे शेंगदाणे आणि भाजलेले शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु भाजलेले शेंगदाणे जास्त तेलकट असू शकतात.
शेंगदाण्यामध्ये असलेले अफलाटॉक्सिन यकृताच्या समस्या देखील वाढवू शकतात.
शेंगदाणे सामान्यत: आरोग्यदायक असतात, परंतु ॲलर्जी किंवा अस्वस्थतेच्या स्थितीत ते खाणे टाळावे.
NEXT: घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी करा 'हे' मिठाचे सोपे उपाय