Dhanshri Shintre
प्रत्येक महिलेला मासिक पाळी दर महिन्याला येते, आणि या काळात नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
नारळ पाणी हे नैसर्गिक टॉनिक असून, ते शरीराला हायड्रेशन देते आणि आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढते.
ते शरीराला ताजेतवाने ठेवून रोगप्रतिकारशक्ती वाढवते. मासिक पाळी दरम्यान नारळ पाणी पिण्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
मासिक पाळी दरम्यान शरीरात पाण्याची कमतरता होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि ऊर्जा मिळते.
मासिक पाळी दरम्यान पोटदुखी व सूज त्रासदायक ठरते, पण नारळ पाण्यातील पोटॅशियम स्नायूंना बळकटी देऊन वेदना कमी करण्यास मदत करते.
नारळ पाण्यातील दाहक-विरोधी गुणधर्म रक्तप्रवाह सुधारतात, त्यामुळे मासिक पाळी दरम्यान वेदना कमी होतात आणि शरीराला आराम मिळतो.
मासिक पाळीतील हार्मोनल बदल मूड स्विंग्स वाढवतात, पण नारळ पाण्यातील ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन वाढवून मानसिक संतुलन राखण्यास मदत करते.
मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना पोटदुखी आणि गॅसचा त्रास होतो, त्यामुळे आरामासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते.