Shraddha Thik
केरळला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. तुम्ही नवीन वर्षात केरळ फिरण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी नक्की वाचा.
भारताच्या दक्षिणेला असलेलं केरळ हे निसर्ग सौंदर्याने वेढलेले आहे आणि नयनरम्य वातारणासाठी ओळखले जाते.
IRCTC ने खास केरळ टूर पॅकेज आणले आहे. नवीन वर्षात तुम्हीही फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
केरळ फिरण्यासाठी IRCTC च्या या परवडणाऱ्या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला मुन्नार ते कोची, थेक्कडी, कुमारकोम येथे जाण्याची संधी मिळत आहे. हे पॅकेज पुण्यापासून सुरू होणार आहे.
Amazing Kerala Ex Pune असं या पॅकेजचं नाव आहे. हे एक कम्फर्ट पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला पुणे ते कोचीपर्यंत फ्लाइटची सुविधा मिळत आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला पॅकेजनुसार थ्री-स्टार हॉटेलमध्ये हॉटेल रूम शेअर किंवा नॉन शेअर करण्याची सुविधा मिळत आहे.
आयआरसीटीसीचे हे 5 दिवसांचं पॅकेज असून या पॅकेजमध्ये तुम्हाला 5 वेळा नाश्ता आणि 5 वेळा जेवणाची सुविधा मिळेल.