Saam Tv
अनियमीत पाळीमध्ये महिलांमध्ये ताणतणाव, झोप न लागणे किंवा अनियनमीत झोप , जीवनशैलीत होणारे बदल आणि हार्मोन्समध्ये चढ-उतार होऊ शकतात.
यावेळी महिलांनी आहारात काही खास पदार्थांचा समावेश केला पाहिजे. या समस्येवर मात करण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ समाविष्ट करु शकतो.
पीरियड्स रेगुलर करण्यासाठी पपई उत्तम मानला जातो. पपईमध्ये लेटेक्स आणि पपेनचे प्रमाण खूप जास्त असते, जे गर्भाशयाची स्नायूंची आकुंचन प्रक्रिया वाढवण्यास मदत करते. यामुळे उशिरा येणारे पीरियड्स नियमित होण्यास किंवा ते वेळेवर सुरू होण्यास मदत मिळते.
दररोज अंडे खाल्ल्याने शरीराला ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. यामुळे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
अळशीच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानल्या जातात. या बीया शरीरासाठी एक सुपरफूड असून त्यामध्ये लिग्नन्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील हार्मोन्स नैसर्गिकरित्या समतोल राखण्यास आणि पीरियड्सच्या काळात होणारा त्रास कमी करण्यास मदत करतात.
मासिक पाळीत महिलांना होणारा त्रास किंवा वेदना कमी करण्यासाठी आहारात दालचिनीचा वापर करू शकतात. यामुळे जास्त होणारा रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.
पीरियड्सच्या काळातील आरोग्यासाठी आल्याला सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपायांपैकी एक मानले जाते. यामध्ये असणारे एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी मदत करते.
NEXT : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?