Siddhi Hande
मुंबई-पुण्यातील इराणी कॅफे खूप प्रसिद्ध आहे. या कॅफेमधील बन मस्का खूप चविष्ट असतो.
कॅफेत चहा आणि बन मस्का खाण्यासाठी गर्दी होते.
इराणी कॅफेचा फेमस बन मस्का तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात.
सर्वात आधी तुम्हाला बन पाव मधून कापायचे आहेत. हे पाव पूर्णपणे वेगळे करु नका.
यानंतर कापलेल्या पावाच्या दोन्ही बाजूंना बटर लावा. तुम्ही बटरमध्ये थोडी साखरदेखील टाकू शकता.
यानंतर तव्यावरदेखील थोडे बटर लावा. त्यावर पाव ठेवा.
मंद आचेवर पाव दोन्ही बाजूंनी सोने होईपर्यंत भाजून घ्या.
यानंतर तुम्ही हा पाव चहासोबत खाऊ शकतात. ईराणी कॅफे स्टाईल बन मस्का आणि चहा हे चविष्ट लागते.