IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डक होणारे फलंदाज

Bharat Jadhav

एबी डिविलियर्स

एबी डिलिवियर्सने दिल्लीच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. २०११ मध्ये तो आरसीबीमध्ये गेला होता. आयपीएल टुर्नामेंटमध्ये तो ६ वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

पार्थिव पटेल

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आयपीएलमध्ये ६ संघांकडून खेळलाय. आपल्या कारकिर्दीत तो ६ वेळा डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद झालाय.

मनदीप सिंग

मनदीप सिंग भारतीय संघातही होता. त्याचा आयपीएल रेकॉर्ड खास नाहीये. पण तोही ६ वेळा गोल्डन डकचा शिकार ठरला आहे.

पियुष चावला

पियुष चावला आयपीएलमध्ये सीएसके,मुंबई, पंजाब आणि केकेआरकडून खेळलाय. आयपीएल कारकिर्दीत तो ६ वेळा गोल्डन डकचा शिकार झालाय.

दिनेश कार्तिक

गेल्या वर्षी आरसीबीकडून खेळल्यानंतर दिनेश कार्तिकने आयपीएलला रामराम ठोकला. २००८ मध्ये पदार्पण करणारा कार्तिक ७ वेळा गोल्डन डकचा शिकार ठरलाय.

विराट कोहली

आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पण तोही गोल्डन डकवर आऊट झालाय. आयपीएलच्या कारकिर्दीत ७ वेळा गोल्डन डकचा शिकार बनलाय.

हरभजन सिंग

हरभजन सिंग आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीत ७ वेळा गोल्डन डकचा शिकार झालाय.

सुनिल नरेन

सुनील नरेन आयपीएलमध्ये ८ वेळा गोल्डन डकचा शिकार बनलाय.

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल टी२० क्रिकेटमध्ये तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. मॅक्सवेल आयपीएलमध्ये १० वेळा गोल्डन डकचा शिकार बनलाय.

राशिद खान

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक गोल्डन डकचा विक्रम राशिद खानच्या नावावर आहे. २०१७ पासून आयपीएलमध्ये खेळणारा राशिद ११ वेळा गोल्डन डकचा शिकार बनलाय.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Jama Masjid: भारतात का बांधल्या गेल्या जामा मशीदी, कुठे-कुठे आहेत या मशिदी?