Bharat Jadhav
अरबी भाषेत जामा म्हणजे शुक्रवार. इस्लाममध्ये शुक्रवारचा दिवस पवित्र दिवस मानला जातो
जामा नावाच्या मशीदी सहसा मोठ्या शहरांमध्ये बांधल्या जातात. येथे अधिकाधिक लोक एकत्र येऊन प्रार्थना करू शकतील.
संपूर्ण परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी सामूहिक प्रार्थनेचे मुख्य केंद्र असतं.
जामा मशीद धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी बांधल्या गेल्या.
दिल्लीतील जामा मशीद भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या मशीदींपैकी एक आहे.
मुंबईतील ही ऐतिहासिक मशीद 18 व्या शतकात बांधली गेली. ही मशीद दक्षिण मुंबईत आहे.
दिल्लीतील जामा मशीद 17 व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने बांधली होती. भारतीय इस्लामिक वास्तुकलेचे प्रतीक म्हणून या मशीदकडे पाहिलं जातं.