ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा पगार झाल्यानंतर पैसा कुठे आणि किती खर्च करावा हे आपल्यापैंकी काहीजणांना काहीवेळा समजत नाही.
तसेच असलेल्या पैशांची गुंतवणूक कशी करावी या बाबतीत अनेकजण गोंधळून जातात त्यामुळे भविष्यात योग्य बचत करु शकत नाही.
जर तुम्हाला देखील भविष्यात योग्य पद्धतीने पैशांची बचत करायची असल्यास पुढे दिलेल्या फॉर्म्युलाची नक्कीच मदत होईल.
५०:३०:२० फॉर्म्युला म्हणजे तुमच्या पगारातील ५०% खर्च महत्वाच्या गोष्टीवर ,३०%मनोरंजनावर तर२०% बचतीवर.
तुम्ही तुमच्या पगारातील साधारण २ ते ३ %पीपीएफमध्ये गुंतवणूक करावी.
ही एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या पगाराच्या ५% पर्यंत इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्याने त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो.
तुमच्या पगारातील ५%टक्के रक्कम दीर्घ मुदतीसाठी SIP मध्ये गुंतवणूक करावी.
मुदत ठेवी म्हणजेच FD मध्ये गुंतवणूक करणे ही फायद्याचे ठरते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही
NEXT: Arranged- Marriage करताना या गोष्टी एकमेकांना नक्की विचारा!