ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सातत्याने लाइट जाण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी अनेकजण घरी इन्व्हर्टर बसवतात.
मात्र एकदा इन्व्हर्टर बसवल्यानंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात,त्यामुळे काही ठिकाणी भयानक आगीच्या घटना घडतात.
चला तर पाहूयात इन्व्हर्टर बसवल्यानंतर कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहीजे.
इन्व्हर्टर घरी बसवल्यानंतर दर महिन्यानंतर इन्व्हर्टरची वायरिंग तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
दर दोन महिन्यानंतर इन्व्हर्टर सर्व्हिसिंग करणे महत्त्वाचे आहे.
शक्यतो उन्हाळ्यात इन्व्हर्टर बॅटरी खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे दर महिन्यात इन्व्हर्टरची बॅटरीही तपासणे गरजेचे आहे.
इन्व्हर्टर कायम पाण्याच्या ठिकाणापासून तसेच गरम ठिकाणापासून लांब ठेवावे.