Manasvi Choudhary
मुंबईपासून जवळ असणारे ठिकाण बदलापूरची ऐतिहासिक ओळख आहे.
बदलापूर या शहराला प्राचीन इतिहास आहे.
छोट्या छोट्या खेडेगावांनी वेढलेल्या या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे.
बदलापूरमध्ये चावीच्या आकाराची प्राचीन विहीर आहे.
बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळोली या गावात ही विहीर आहे.
सोळाव्या शतकात या विहीरीचे बांधकाम करण्यात आले असून काळ्या कातळ दगडाचा वापर केला आहे.
विहीरीची खोली साधारणपणे ७० ते ७२ फूट आहे विहीरीच्या मध्यभागी गणपतीचे आणि हत्तीचे शिल्प कोरलेले आहे.
चावीच्या आकाराच्या या विहीरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने या विहीराला पाणी असते.
कितीही दुष्काळ असला तरी या विहीरीचे पाणी आटत नाही असे तेथील गावकरी सांगतात.