Manasvi Choudhary
मागील अनेक दिवसांपासून बीड जिल्हा हा चर्चेत आहे.
बीड जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
यानुसार बीड जिल्ह्याला बीड हे नाव कसं पडलं हे जाणून घेऊया.
बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर आहे.
पर्वत रांगेतील बीळ म्हणडेच खड्डा म्हणून याचे नाव बीड असे आहे.
बीळ या मूळ शब्दापासून बीड हे नाव पडलं असावे.
रामायणातील जटायू रावणाशी युद्ध करून ज्या ठिकाणी कोसळला ते ठिकाण बीड होते असे म्हटले जाते.