Shraddha Thik
दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा करतात.
महिला दिनानिमित्त तुम्ही गुगल केले तर तुम्हाला बऱ्याचदा जांभळ्या रंगात काही कोट्स किंवा फोटोज दिसतील.
महिला दिनाचा आणि जांभळ्या रंगाचा खूप जवळचा संबंध आहे.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा महिलांनी मतदानाच्या हक्कासाठी लढा दिला.
हक्कासाठी लढा देण्यासाठी त्यावेळी जांभळा, पांढरा आणि हिरवा रंग हा वापरला गेला. प्रतिष्ठेसाठी जांभळा, शुद्धतेसाठी पांढरा आणि आशासाठी हिरवा रंग होता.
हे रंग चळवळीदरम्यान बॅनर, रिबनल, रॅलीदरम्यान परिधान केलेल्या कपड्यांमध्ये वापरले गेले होते. यासोबतच जांभळा रंग सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि अध्यात्माशी संबंधित होता.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा Official Color म्हणून जांभळा रंग ओळखला जातो. यामुळे महिला दिनानिमित्त जांबळ्या रंगाला महत्व आहे.