साम टिव्ही
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट सध्या खूप चर्चेत आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेच्या फायनलआधीच तिचं वजन १०० ग्रॅम वाढलं. त्यामुळं तिला ऑलिंपिकमधून बाहेर व्हावं लागलं.
ऑलिंपिक नियमानुसार, विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलंय. आता विनेशनं वकिलांमार्फत कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये संयुक्तरित्या रौप्यपदक देण्याची मागणी केली आहे.
कोर्टाचा निर्णय येणारच आहे. पण त्याआधी आपण विनेश फोगाटच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात. कुस्ती, प्रेम आणि नंतर लग्न अशी तिची लव्हस्टोरी आहे. ती खूपच इंटरेस्टिंग आहे.
सोमवीर राठी असं विनेशच्या पतीचं नाव आहे. रेल्वेमध्ये नोकरी करतानाच दोघांची भेट झाली.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये काही बोलणं होत नव्हतं. पण काही वेळानंतर हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं आणि दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमली.
आधी मैत्री, मग प्रेम आणि काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोमवीर यानं २०१८ मध्ये दिल्ली विमानतळावरच विनेशला प्रपोज केलं.
विनेश फोगाट जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून परत येत होती. त्यावेळी विनेशनं सोमवीरनं ठेवलेला प्रेमप्रस्ताव स्वीकारलाही होता.
सोमवीरने विनेशला अंगठी दिली होती. प्रपोज स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच दोघांनी लग्न केलं.