Shraddha Thik
आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली असेलच.
त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की, डॉक्टर मंडळी सफेद रंगाचा अॅप्रन घालतात आणि गळ्यात स्टेथस्कोप असतो.
पांढरा कोट घालणारे हे डॉक्टर किंवा सर्जन मंडळी शस्त्रक्रियेपूर्वी म्हणजेच ऑपरेशनपू्र्वी मात्र हिरवे कपडे परिधान करतात हे देखील आपण सर्वांनी नक्कीच पाहिले असेल.
ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना सर्व सर्जन किंवा इतर सहकारी हिरवा रंगाचा कोट का घालतात?
जेव्हा तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत प्रकाशमय ठिकाणाहून प्रवेश करता आणि हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या संपर्कात असता तेव्हा तुम्हाला बरे वाटते.ऑपरेशन रूममध्ये डॉक्टरही याच गोष्टीचा अनुभवतात.
हिरवा आणि निळा हे प्रकाशाच्या स्पेक्ट्रमवर लाल रंगाच्या विरुद्ध आहेत आणि ऑपरेशन दरम्यान, सर्जनचे लक्ष मुख्यतः लाल रंगावर असते.
कापडाचा हिरवा आणि निळा रंग केवळ सर्जनची दृष्टीच वाढवत नाही तर लाल रंगासाठी त्याला अधिक संवेदनशील बनवते.