Dhanshri Shintre
मुलांच्या डब्यासाठी काय बनवावे असा प्रश्न तुम्हालाही रोज पडत असेल.
आजकाल शाळेत छोटी आणि मोठी सुट्टी असते. छोटी सुट्टीसाठी हलका नाश्ता आणि मोठ्या सुट्टीसाठी जेवण म्हणून तुम्ही टोमॅटो भात तयार करू शकता.
टोमॅटो भात तयार करण्यासाठी, बासमती तांदूळ, तेल, गरम मसाले, हिरवी मिरची, टोमॅटो, हळद, मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, हिंग, मीठ, तमालपत्र, जिरे आणि पाणी वापरून स्वादिष्ट भात तयार करा.
कुकरमध्ये तेल गरम करून, त्यात मोहरी, जिरे आणि तमालपत्र टाकून चांगले परतून, नंतर चिरलेली मिरची टाकून परतून घ्या.
कांदा टाकून चांगले परतून घ्या, नंतर टोमॅटो टाकून परतून घ्या. हवे असल्यास, टोमॅटोची पेस्ट करून टाकू शकता.
आता आले-लसूण पेस्ट घालून, ते चांगले परतून घ्या, ज्यामुळे त्यात चव येईल आणि मसाले व्यवस्थित मिसळतील.
आता हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धने पूड आणि मीठ घालून सर्व मसाले चांगले परतून घ्या, त्यामुळे चव मिश्रणात भरपूर मिळेल.
तांदूळ घालून सर्व घटक एकत्र करा, त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित हलवून ठेवा.
कुकरचे झाकण लावून तीन शिट्या देऊन भात शिजवून घ्या. तुमचा स्वादिष्ट टोमॅटो भात आता तयार आहे.