Dhanshri Shintre
जलद आणि पौष्टिक नाश्ता हवं का? १५ मिनिटांत तयार होणारा चवदार दही सँडविच रेसिपी हलक्या नाश्त्यांसाठी परफेक्ट आहे.
दही सँडविचसाठी १ कप दही, ६ ब्रेड तुकडे, काकडी, गाजर, भोपळी मिरची, मिरी पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, लोणी आणि जाड दही वापरून स्वादिष्ट रेसिपी तयार करा.
दही सँडविच तयार करण्यासाठी, सर्वप्रथम दही एक भांड्यात घेतल्यावर ते चांगले फेटून घ्या.
दही फेटल्यावर त्यात आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण तयार करा.
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, तयार मिश्रण ब्रेड स्लाईसवर लावून दुसरा स्लाईस वर ठेवा.
तव्यावर तूप घालून सँडविच दोन्ही बाजूंनी भाजा, आणि तुमचं चवदार दही सँडविच तयार होईल.
गरमागरम दही सँडविच पुदिन्याच्या चटणी किंवा केचपसोबत चवीने खा, जो तुम्हाला निश्चितच आवडेल.