Shreya Maskar
झणझणीत मसाला भाजीत घालण्यासाठी चटपटीत वाटण बनवा.
वाटण बनवण्यासाठी सुकं खोबरे , कांदे, ओल्या नारळाचा किस, खसखस, मसाले, तेल, तीळ, वेलची, खडे मसाले आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
वाटण बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये वेगवेगळे ओल आणि सुक खोबरं परतून घ्या.
त्यानंतर चिरलेला कांदा पॅनमध्ये टाकून भाजून घ्या.
कांदा गोल्डन फ्राय झाल्यावर त्यात काळी मिरी, जिरे, धने, तमालपत्र, वेलची, दगडफूल, जायफळ आणि तीळ मिक्स करा.
गॅस बंद करून यात खसखस टाका.
मिक्सरच्या भांड्यात मसाला, ओल्या नारळाचा किस, सुकं खोबरे वाटून घ्या.
वाटणामध्ये चवीनुसार मीठ टाकून हवा बंद डब्यात स्टोर करा.