Shruti Vilas Kadam
अर्ध्या तासात नैसर्गिक निखार मिळवण्यासाठी घरच्या पदार्थांनी बनवलेला हा फेसपॅक उपयुक्त आहे.
या फेसपॅकमध्ये ‘दूधाची मलाई’ (१ चमचा), ‘मध’ (१ चमचा) आणि एक चिमुटभर ‘हळद’ वापरली जाते.
हा फेसपॅक १००% नैसर्गिक असून सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित मानला जातो .
या फेसपॅकमुळे त्वचा डीप क्लीन्स, मऊ आणि ताजीतवानी बनते .
एका वाटीत दूधाची मलाई, मध आणि हळद एकत्र करून नीट मिसळून पॅक तयार करावा.
प्रथम त्वचा फेसवॉशने स्वच्छ धुवावी. ब्रशच्या मदतीने तयार पॅक चेहरा व मानेवर २० मिनिटे लागू ठेवावा. नंतर पाण्याने पॅक साफ धुवावा.
व्यस्त जीवनशैलीत, जर अर्ध्या तासात त्वचा फ्रेश, ग्लोईंग दिसावी असे वाटत असेल, तर हा फेसपॅक एकदम परफेक्ट उपाय आहे