Siddhi Hande
नेहमीची साधी मॅगी किंवा मसाला मॅगी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.
तुम्ही नाश्त्याला झटपट चीज मॅगी बनवू शकतात. चीज मॅगी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.
सर्वात आधी मसाला मॅगीसाठी लागणारे साहित्य घ्या. यामध्ये कांदा, टॉमेटो, कोथिंबीर चिरुन घ्या. यात तुम्ही एकदम बारीक चिरलेली मिरची टाकू शकतात.
सर्वात आधी कढईत थोडं तेल टाका. त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडू द्या.
यानंतर कढईत कांदा, टॉमेटो आणि मिरची परतून घ्या. यात तुम्ही हिरवे वाटाणेदेखील टाकू शकतात.
यामध्ये मॅगी मसाला, लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार मीठ टाका. त्यात थोडं पाणी टाका.
यानंतर तुम्हाला हवं असेल तितकं पाणी टाका. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
पाणी उकळल्यानंतर त्यात मॅगी टाका. यानंतर मॅगी शिजली की गॅस बंद करा.
यानंतर मॅगीवर वरुन चीज किसून टाका. कोथिंबीर टाकून मॅगी छान गार्निश करा.