Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

Shreya Maskar

लगीन घटिका समीप आली...

दिवाळी झाल्यावर लग्नसराईला सुरुवात होते. तुमचेही महिन्याभरावर लग्न आले असेल तर ग्लोइंग आणि तजेलदार त्वचेसाठी डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा आणि पेयांचा समावेश करा.

bridal glow | pinterest

वधुचा ब्रायडल ग्लो

तुम्हाला सात दिवसांत चेहऱ्यावर ग्लो हवा असेल आणि चेहरा स्वच्छ ताजातवाना दिसायला हवा असेल तर बीटचे सेवन करा. सात दिवसात तुम्हाला त्वचेत नक्कीच फरक दिसेल. बीटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक नायट्रेट्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

Bride's Bridal Glow | pinterest

बीट

बीटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट संयुगे असतात. कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते आणि ते पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यासही मदत करते.

Beetroot | pinterest

इतर महत्त्वाचे घटक

बीटच्या सेवनासोबतच शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. यामुळेही तुमच्या त्वचेच्या स्वरूपात आणि आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतात.

Other important factors | pinterest

बीटरूट ड्रिंक

बीटरूट ड्रिंक बनवण्यासाठी बीट, बडीशेप, वेलची, तुळशीची पाने आणि पाणी इत्यादी साहित्य लागते. यांचे प्रमाण योग्य घ्या.

Beetroot drink | pinterest

तुळशीची पाने

एका लहान पॅनमध्ये एक ग्लास पाणी घ्या. त्यात बीटचे काप, बडीशेप, हिरव्या वेलच्या आणि तुळशीची पाने टाका.

Basil leaves | pinterest

बडीशेप-वेलची

मिश्रण मंद आचेवर उकळू द्या. तयार पाणी गाळून एका कपमध्ये घ्या. थोडे कोमट होऊ द्या आणि उबदार असतानाच हळूहळू प्या.

cardamom | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Gautami Patil | SAAM TV
येथे क्लिक करा...