Saam Tv
रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्यात ट्राय करा गाजराचा चिला. चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल
१ कप किसलेले गाजर, १ कप बेसन, पाव कप रवा, २-३ चमचे दही, १ बारीक चिरलेला कांदा, २-३ हिरव्या मिरच्या, आले पेस्ट आणि कोथिंबीर .
चिल्याला छान चव देण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ घ्या.
एका भांड्यात बेसन, रवा आणि दही एकत्र करा. त्यात हळूहळू पाणी घालून गुठळ्या नसलेले पीठ तयार करा. पीठ ना जास्त पातळ असावे, ना जास्त घट्ट. १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
तयार पिठात किसलेले गाजर, कांदा, हिरवी मिरची, आले पेस्ट आणि कोथिंबीर घाला. त्यानंतर लाल तिखट, हळद, जिऱ्याची पूड आणि मीठ टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
गरम तव्यावर थोडे तेल किंवा तूप लावा. त्यावर पिठाचा एक मोठा चमचा टाकून गोलाकार पसरवा. मध्यम ते मंद आचेवर चिला भाजू द्या.
चिल्याची खालची बाजू सोनेरी आणि कुरकुरीत झाली की तो अलगद पलटवा. दुसरी बाजूही छान भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आला की गरमागरम चिला तयार
तयार गाजराचा चिला हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. अधिक पौष्टिक बनवण्यासाठी पिठात किसलेले पनीर किंवा बारीक चिरलेला पालकही घालू शकता.
NEXT : Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ