ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कॅन्सर हा एक प्राणघातक आजार आहे. कॅन्सर हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. खराब जीवनशैलीमुळे देखील कॅन्सर होण्याचा धोका वाढतो
कॅन्सरपासून बचावासाठी कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, जाणून घ्या.
आहारामध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या बेरीजचा समावेश करा. यामुळे कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होतो.
ब्रोकोलीमध्ये स्लफोराफेन नावाचा कंपाउंड भरपूर प्रमाणात आढळतो. म्हणून दररोज ब्रोक्रोली खाल्ल्याने कॅन्सरपासून सरंक्षण होण्यास मदत होते.
फ्लावरमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, फायबर, कोलीन आणि अॅटी-ऑक्सिंडट्स सारखे पोषक तत्व आढळतात. जे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक घटक असते. अॅलिसिनमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात.
कॅन्सरसारख्या धोकादायक आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे सेवन करा. हळदीमधील कर्फ्यूमिन कंपाऊंडमध्ये अँटी-इन्फ्लेमेन्टरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.